Saturday, December 14, 2013

!!ब्रह्मानन्दं परम् सुखदं केवलम् ज्ञानमूर्तिं !

पूर्व दुषित ग्रह आणि सतत आपल्या हातून इतरांची चालू असलेली उपेक्षा माणसाला कधीच सुख देऊ शकत नाही. सद्सद्विवेक बुद्धी गहाण पडली कि माणसाचे मन कायम भूतकाळात जाऊन जुन्या खपल्या काढत बसते आणि त्याचमुळे मन दुश्चित्त होऊन नकारात्मकता वाढीस लागते. जीवनात प्रत्येक मानवाला चांगले वाईट परिणाम त्याच्या कर्मास्वरूप भोगावे लागतात आणि त्यातूनच सकारात्मकतेने आपले पुढील गन्तव्य सुधारायचे असते. सद्गुरू लाभला कि हे गन्तव्य अधिक सुखकर होते कारण जीवनाच्या अनुष्ठानाची व्यापक प्रचीती त्याला येते. गुरुकृपायोगामुळेच मानवी जीवनाची खरी भरभराट होते आणि म्हणूनच सदगुरुचे स्थान हे ईश्वराच्या स्थानापेक्षा अधिक महत्वाचे असते. श्री गुरुचरित्रात सांगितले आहे कि ईश्वर कोपला तर सद्गुरू तारतो पण सद्गरु जर .. तर त्याला तारणहार कोणीही नाही.
!!
ब्रह्मानन्दं परम् सुखदं केवलम् ज्ञानमूर्तिं ! द्वन्द्वादितम् गगन सदृशं तत्वमत्स्थ्यदि लक्षणं !!!! एकं नित्यं विमल मचलं सर्वधि साक्षी भूतं ! भावातितम् त्रिगुणरहितं सद्गुरुम तं नमामि !! जय शङ्कर !!श्री गुरुदेव दत्त !!