एकदा बघा एक गम्मत झाली, काळ्या मातीत एक बी पडली !
रिमझिम करीत पावसाची सर आली, काळी माती ओली झाली !!
मृद्गंध दरवळला मग सर्वत्री .. जल्लोष करीत मुले आली अंगणी !
एकदा बघा एक गम्मत झाली, काळ्या मातीत एक बी पडली !
बघता बघता अंकुर हा फुटला .. रोपट्यात मग रुपांतरीत झाला !!
अंकुर फुटता बी चे अस्तित्व संपले, रोपट्याचे मग वटवृक्ष हे झाले !
असते खरे हेची सत्य जीवनाचे ...अद्वैतामध्ये कायम दडलेले असते !!जय शंकर!!